‘वर्ष २०२२ मध्ये एकदा आश्रमातील साधक श्री. रोहित साळूंके मला म्हणाले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुम्हाला सूक्ष्मातून मिळत असलेले ज्ञान प्रसिद्ध होते. पूर्वी ते वाचून मला चांगले वाटत होते; परंतु आता त्यातून मला ‘आनंद’ आणि ‘शांती’, यांची अनुभूती येते.’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘काही दिवसांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्ञानप्राप्तकर्ते साधक (कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप) यांना मिळणार्या ज्ञानातील सत्यतेची टक्केवारी तपासली. त्यानुसार वर्ष २०१६ मध्ये तिघांना मिळणार्या ज्ञानाची सत्यता ७० टक्के इतकी होती, तर वर्ष २०२२ मध्ये ज्ञानाची सत्यता ८० टक्के इतकी आहे. सत्यतेचे प्रमाण वाढल्याने ज्ञानातील ईश्वरी तत्त्वही वाढले. त्यामुळे ज्ञानातून ‘आनंद’ आणि ‘शांती’, यांची अनुभूती येते, तसेच या धारिका परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः पडताळत असल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे साधकांना मिळणारे ज्ञानही चैतन्यमय होते.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)
|