श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. सौ. आशा राठी, जयपूर, राजस्थान.

१ अ. प्रीती : ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या केवळ साधकांवरच नाही, तर त्या सर्व प्राणीमात्रांवर आपल्या प्रीतीचा वर्षाव करून त्यांचा उद्धार करतात. मी नाथद्वारा (राजस्थान) येथील श्रीनाथजी मंदिराच्या गोशाळेत त्यांच्या समवेत गेले होते. तेथे २ मोठे बैल होते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्या बैलांच्या कानात नामजप म्हटला आणि त्यांचा उद्धार केला.’

२. श्री. ऋषी राठी, जयपूर, राजस्थान.

२ अ. साधकाला नेमका स्वभावदोष सांगून मनावर मात करण्यास साहाय्य करणे : ‘एकदा मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना माझ्या मनामध्ये चालू असलेला संघर्ष सांगितला. तेव्हा त्यांनी त्यामागील माझा नेमका स्वभावदोष सांगितला. तेव्हापासून जेव्हा माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा मला त्यांचे बोल आठवतात आणि मनाच्या संघर्षातून लवकर बाहेर पडता येते.’

३. कु. यशिका राठी, जयपूर, राजस्थान.

३ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधिकेला ‘निर्णय घेता न येणे’ या स्वभावदोषावर मात करण्यास साहाय्य करणे : ‘एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासह मला भोजन करण्याची संधी मिळाली. तेव्हा आम्हाला वाढणार्‍या साधिकेने मला विचारले, ‘‘तुम्ही पोळी घेणार का ?’’ त्या वेळी माझ्या मनात गोंधळ निर्माण झाल्यामुळे मला ‘हो’ किंवा ‘नाही’, असे म्हणता आले नाही. असेच दुसर्‍या ठिकाणीही झाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या मनात एवढा गोंधळ का असतो ? यासाठी तुम्हाला स्वयंसूचना घेतल्या पाहिजेत. नाहीतर सतत बुद्धीने विचार करण्यात वेळ जाणार !’’ त्यानुसार मी स्वयंसूचना घेतल्यावर मला लगेच निर्णय घेता येऊ लागला आणि त्यातून मला आनंद मिळाला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १.१२.२०२४)