मुंबई – राज्यात महायुतीच्या मंत्रीमंडळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यावर ‘पावलापावलांवर मनाविरुद्ध घडत असतांना जो पुढे जातो, तो खरा कार्यकर्ता !’, असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘शपथविधीपूर्वी ‘मला मंत्रीपद देणार’, असे सांगण्यात आले होते. कदाचित नवे दायित्व देण्यात येणार असेल म्हणून ते झाले नसेल. ‘मला मंत्रीपद मिळणार नाही’, असे कधीच सांगितले नाही. मी अप्रसन्न असण्याचे कारण नाही. पक्षाने जे आदेश दिले, जे दायित्व दिले, त्यांचे पालन करणे, हेच मी करत आलो आहे. पक्षाने कायम प्रेम दिले आणि मीही जीव ओतून काम केले.’’