महाराष्ट्राला प्रगतीशील बनवण्यासह हिंदु समाजाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार ! – नितेश राणे, मंत्री

नितेश राणे

नागपूर – विरोधकांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (इ.व्ही.एम्.च्या) विरोधातील आंदोलनाला अर्थ नाही. आमचे सरकार हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ तरुणांकडे फार मोठे दायित्व दिले आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदु समाज यांचे रक्षण करणे, या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, तसेच महाराष्ट्राला प्रगतीशील राज्य बनवण्यासाठी मी माझ्या पदाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न करीन. मला दिलेले दायित्व १०० टक्के प्रामाणिकपणे पार पाडता येईल, या दृष्टीकोनातून मी पावले उचलीन, असे भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि नवनियुक्त मंत्री नितेश राणे यांनी येथे सांगितले. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे अधिवेशनासाठी आलेले नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.