राज्यघटनेचा अवमान सहन केला जाणार नाही ! – मुख्यमंत्री

बीड आणि परभणी येथील घटना गंभीर !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १६ डिसेंबर (वार्ता.) – ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणी येथील दंगल प्रकरण या घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची सिद्धता असून राज्यघटनेचा अवमान सहन केला जाणार नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी या संदर्भात सूत्र स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित करून यावर चर्चा करण्याची मागणी केली; मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळली. आज शोकप्रस्ताव असल्याने पुढे स्थगन प्रस्तावाच्या वेळी सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.