नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून हा कायदा कठोर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी १५ डिसेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले. ‘गोमाता ही राजमाता आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतरही अनेक शहरांत सर्रासपणे गोहत्या होत आहेत, गायींना घेऊन जाणारे ट्रक जाळले जात आहेत, तरीही गोहत्या का बंद होत नाहीत ?’, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री बोलत होते.