मुंबई – १८ वर्षांहून अल्प वयाची मुले वाहन चालवतांना आढळल्यास ते वाहन जप्त करण्यात यावे, असा आदेश राज्य वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी एक परिपत्रक काढले आहे. यापूर्वी १८ वर्षांपेक्षा अल्प वयाची मुले वाहन चालवतांना आढळल्यास पोलिसांकडून वाहन कह्यात घेऊन पालकावर दंडात्मक कारवाई केली जात होती.
‘तडजोडपात्र इ-चलन प्रकरणात चालक रक्कम भरण्यास सिद्ध नसल्यास त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करावे. विनातडजोड प्रकरणात तात्काळ दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात यावे. न्यायालयात खटला प्रविष्ट केल्यानंतर संबंधित व्यक्ती उपस्थित न राहिल्यास न्यायालयातून रितसर अनुमती घेऊन वाहन जप्त करावे’, असे या परिपत्रकात म्हटले आहे.