लाचप्रकरणी गुन्हा नोंद झालेले न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

सातारा – जामीन आवेदनाविषयी साहाय्य आणि तो संमत करून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ग ३ धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी न्यायाधीश निकम यांनी प्रविष्ट केलेला अंतरिम जामीन फेटाळल्यावर त्यांनी प्रविष्ट केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणी सरकारपक्षाची बाजू ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश व्ही.आर्. जोशी यांनी न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळाला आहे. या प्रकरणात सर्व संशयितांचे ६ महिन्यांत ९ घंटे वेगवेगळ्या वेळी भ्रमणभाषवरून संभाषण झाल्याचे ध्वनीमुद्रण उपलब्ध असल्याचे सरकार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.