नागपूर – होय, मी अप्रसन्न आहे. मंत्रीपदाविषयी मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावलले, त्यांनाच प्रश्न विचारा. ८ दिवसांपूर्वी मला ‘राज्यसभेवर जा’, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो; मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे पक्षाला स्पष्टपणे कळवले. माझ्याऐवजी मला डावलणार्यांना तुम्ही प्रश्न विचारा !, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत.