Indian-American Congressman Shri Thanedar : अमेरिकेने बांगलादेशावर कारवाई करण्याची वेळ आली आहे !

भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री. ठाणेदार यांची मागणी

भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री. ठाणेदार

वॉशिंग्टन (अमेरिका) : बांगलादेशात जमावाने हिंदु मंदिरांची नासधूस केली. आता अमेरिकी संसद आणि अमेरिकी सरकार यांनी बांगलादेशात कारवाई करण्याची वेळ आली आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी तेथे प्रत्येक शक्य साधन वापरण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री. ठाणेदार यांनी केली आहे.

१. शेख हसीना सरकारची सत्तेतून हकालपट्टी केल्यापासून श्री. ठाणेदार हिंदूंवरील आक्रमणाचे सूत्र सातत्याने मांडत आहेत. ते म्हणाले की, बांगलादेशात वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हिंदूंवर हिंसाचार चालू आहे. नुकतेच एका हिंदु पुजार्‍याला अटक करून त्याच्या अधिवक्त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे.

२. भारतीय अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी खासदार रुबियो यांना बांगलादेशातील अल्पसंख्य, प्रामुख्याने हिंदूंवरील हिंसाचाराचे सूत्र सोडवण्याची विनंती केली आहे. अलीकडेच बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांंच्या विरोधात मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकी यांनी मोर्चे काढले.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील एक हिंदु खासदार त्यांच्या सरकारकडे अशा प्रकारची मागणी करतो; मात्र भारतातील एकही हिंदु खासदार केंद्र सरकारकडे अशा प्रकारची मागणी करत नाही, हे लज्जास्पद आहे !