धर्माचरणाची आवड असलेला ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा रत्नागिरी येथील कु. अंबरीष प्रथमेश शहाणे (वय ८ वर्षे) ! 

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. अंबरीष प्रथमेश शहाणे हा या पिढीतील एक आहे !

‘मार्गशीर्ष शुक्‍ल चतुर्दशी (१४.१२.२०२४) या दिवशी कु. अंबरीष प्रथमेश शहाणे याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. अंबरीष प्रथमेश शहाणे याला आठव्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. अंबरीष प्रथमेश शहाणे

‘वर्ष २०१७ मध्‍ये ‘चि. अंबरीष प्रथमेश शहाणे उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आला असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५५ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२४ मध्‍ये त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के झाली आहे. त्‍याच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, त्‍याची साधनेची तळमळ आणि त्‍याच्‍यातील  भाव यांमुळे आता त्‍याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.११.२०२४)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. प्रेमभाव

श्री. प्रथमेश शहाणे

‘मी (श्री. प्रथमेश) तबलावादनाचा शिकवणीवर्ग घेतो. अनेक लहान मुले शिकवणीवर्गात येतात. त्‍या वेळी अंबरीषला भूक लागली असल्‍यास मी (सौ. देवश्री) त्‍याला जे खायला देते, ते तो ‘‘सर्वांना दे’’, असे सांगून नंतर स्‍वतः खातो.

२. धर्माचरणाची आवड

अ. आम्‍ही त्‍याच्‍या वयाच्‍या पाचव्‍या वर्षी त्‍याचा ‘चौल संस्‍कार’ (चूडाकर्म, शेंडी ठेवणे – टीप) केला. त्‍या वेळी त्‍याला शेंडी ठेवली होती. त्‍या वेळी त्‍याने कधीही ‘‘मुले मला चिडवतात’’, असे गार्‍हाणे केले नाही.

(टीप : ‘चौलकर्म – हा हिंदु धर्मातील सोळा संस्‍कारापैकी एक संस्‍कार आहे. मुलाच्‍या वयाच्‍या पहिल्‍या, तिसर्‍या किंवा पाचव्‍या वर्षी हा विधी करतात. आयुष्‍य, बल आणि तेज यांची वृद्धी व्‍हावी; म्‍हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्‍कार करतात.’ – संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सोळा संस्‍कार’)

आ. तो कपाळाला टिळा लावून बाहेर जातो.

३. त्‍याला देवता, संत आणि शिवाजी महाराज यांच्‍या संदर्भातील गोष्‍टी ऐकायला आवडतात.

४. साधनेची आवड

सौ. देवश्री शहाणे

तो श्‍लोक, स्‍तोत्र म्‍हणतो आणि आरती करतो. तो नियमित प्रार्थना करतो. तो झोपतांना त्‍याच्‍या भोवती देवतांच्‍या नामपट्ट्यांचे मंडल घालतो.

५. चुकांविषयी संवेदनशील

त्‍याच्‍याकडून एखादी चूक झाली, म्‍हणजे तो कुणावर रागावला किंवा तो काही उलट बोलला, तर तो कान पकडून संबंधितांची क्षमा मागतो.

६. देवाप्रती भाव

त्‍याचा ‘देवाला काहीही अशक्‍य नाही’, असा भाव असतो. तो काही वेळा देवाला विचारून कृती करतो.

७. परात्‍पर गुरु  डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव

त्‍याला ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ पहायला आवडतात. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी त्‍यांचे दर्शन झाल्‍यावर अंबरीषचा भाव जागृत झाला होता. त्‍याच्‍या डोळ्‍यांतून पुष्‍कळ वेळ भावाश्रू वहात होते.

८. जाणवलेला पालट

पूर्वी तो शाळेत मस्‍ती करायचा, आता तो मस्‍ती करत नाही.

९. अंबरीषला आलेली अनुभूती

एकदा तो झोपत असतांना त्‍याच्‍या आजीने त्‍याला श्रीकृष्‍णाची गोष्‍ट सांगितली. त्‍या वेळी त्‍याला सर्वत्र मोरपीस आणि श्रीकृष्‍णही दिसत होता. त्‍या वेळी त्‍याचा पुष्‍कळ भाव जागृत झाला होेता आणि त्‍या स्‍थितीत तो १५ मिनिटे होता.

– सौ. देवश्री प्रथमेश शहाणे आणि श्री. प्रथमेश रविकांत शहाणे (कु. अंबरीषचे आई-वडील), रत्नागिरी (१२.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक