अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा हिंदुद्वेष !
अलीगड – आतंकवादी आणि देशविरोधी कारवाया यांना पाठिंबा देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अलीगड मुस्लिम विद्यापिठाने (‘ए.एम्.यू.’ने) पुन्हा एकदा हिंदूंना डिवचण्याचे काम केले आहे. आता विद्यापिठाने विद्यार्थ्यांना गोमांस दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘ए.एम्.यू.’च्या सूचनेत म्हटले आहे की, रविवारच्या जेवणाच्या मेनूमध्ये पालट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिली जाईल.
१. अलीगढ मुस्लिम विद्यापिठात मुलांसाठी आणि मुलींसाठी २० वेगवेगळी वसतीगृहे आहेत. या वसतीगृहांत ‘बीफ बिर्याणी’ पुरवण्याविषयी नोटीस बजावल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. हिंदु नेत्यांनी ‘ए.एम्.यू.’च्या कुलगुरूंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदु विद्यार्थ्यांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
२. अलीगडचे भाजप लोकसभा खासदार सतीश गौतम यांनीही विद्यापीठ प्रशासनाला चेतावणी दिली आहे. त्यांनी बीफ पार्टी आयोजित करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
३. अलीगढ पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी नोटीस बजावणार्या महंमद फैजुल्ला आणि अहमद भाटी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांना पाठिंबा देणार्या आणि हिंदुविरोधी करावाया करणार्या अशा विद्यापिठाला टाळे ठोकण्यापासून सरकारला कोण रोखत आहे ? |