आध्‍यात्मिक संशोधन केंद्रात वैष्‍णोदेवीचे अस्‍तित्‍व असल्‍याविषयी सौ. श्‍वेता क्‍लार्क यांना आलेली अनुभूती

वैष्‍णोदेवी

१. कपडे वाळत घालायची जागा स्‍वच्‍छ करतांना पुष्‍कळ उत्‍साह जाणवणे आणि मनात वैष्‍णोदेवीविषयी भजन गुणगुणत असतांना भावजागृती होणे 

‘एकदा सकाळी ‘तिसर्‍या माळ्‍यावरील कपडे वाळत घालायची जागा स्‍वच्‍छ करावी’, असा विचार माझ्‍या मनात आला. तशी ही जागा मोठी आहे. मला माझ्‍याभोवती वैष्‍णोदेवीची दैवी शक्‍ती असल्‍याचे जाणवले. मला पुष्‍कळ उत्‍साह जाणवत होता. मी स्‍वच्‍छता करायला आरंभ केला आणि ‘तुने मुझे बुलाया शेरा वालिये, मैं आया, मैं आया शेरा वालिये, ज्‍योता वालिये, पहाडा वालिये, मेहरा वालिये, तुने मुझे बुलाया शेरा वालिये, मैं आया, मैं आया शेरा वालिये…।’ हे भजन मनात गुणगुणु लागले. त्‍या वेळी माझा भाव पुष्‍कळ जागृत होत होता.

२. वैष्‍णोदेवीने ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या (श्रीविष्‍णूच्‍या) कार्यात सहभागी होण्‍यासाठी आले आहे’, असे सांगणे

सौ. श्वेता क्लार्क

मला सूक्ष्मातून दिसले, ‘वाघावर आरूढ असलेली वैष्‍णोदेवी आध्‍यात्मिक संशोधन केंद्राकडे पहात होती.’ वैष्‍णोदेवी भारताच्‍या उत्तरेकडील भागांचे रक्षण करते. वैष्‍णोदेवी भारताच्‍या उत्तर सीमेचे रक्षण करत असल्‍याने तिला ‘पहारादेवी’ असेही म्‍हणतात. वैष्‍णोदेवीने सांगितले, ‘तिचा वास आध्‍यात्मिक संशोधन केंद्रात आहे आणि तेथून सर्वत्र लक्ष ठेवता येते. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ‘ईश्‍वरी राज्‍याच्‍या स्‍थापने’च्‍या कार्याचे रक्षण करण्‍यासाठी ती आली आहे.’

माताराणी मला म्‍हणाली, ‘भारतातील सर्व राज्‍यांतील देवता जागृत आहेत आणि परात्‍पर गुरुदेवांच्‍या (श्रीविष्‍णूच्‍या) कार्यात सहभागी झाल्‍या आहेत. परात्‍पर गुरुदेवांच्‍या कार्यात सहभागी होण्‍यासाठी मी उत्तरेकडून माझ्‍या प्रगट शक्‍तीसह वाघावर आरूढ होऊन आले आहे.

३. वैष्‍णोदेवीने ‘रामनाथी आश्रमात पुष्‍कळ देवता वास करत असून आपण पूर्ण क्षमता वापरून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करू’, असे सांगणे 

नंतर देवी म्‍हणाली, ‘तुला कधी वेळ मिळेल त्‍या वेळी आश्रमाची स्‍वच्‍छता करायला जा; कारण पुष्‍कळ देवता आश्रमात वास करतात. त्‍याबद्दल कर्तेपणा घेण्‍याची आवश्‍यकता नाही किंवा ‘कुणी कौतुक करील’, अशीही अपेक्षा नको. माझ्‍या येथील वास्‍तव्‍याची माहिती मी तुला दिली, हेच मोठे पारितोषक आहे. प्रत्‍येक राज्‍यातील देवता परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कार्यात सहभागी होण्‍यासाठी जागृत झाल्‍या आहेत. उत्तर भारतही आता मागे रहाणार नाही. आपण परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी सर्वस्‍व अर्पण करू. आपली पूर्ण क्षमता वापरून त्‍यांची सेवा करू. अशी सुवर्णसंधी पुन्‍हा लाभणार नाही. जयतु जयतु हिंदुुराष्‍ट्रम् ।’

देवीने लाल साडी परिधान केली होती आणि सर्व शस्‍त्रे घेऊन ती वाघावर आरूढ झाली होती.

४. स्‍वच्‍छता करत असतांना ४५ मिनिटे माझा भाव पुष्‍कळ जागृत होऊन माझ्‍या डोळ्‍यांत भावाश्रू तरळत होते, तसेच माझ्‍या शरिरावर रोमांचही येत होते.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या पवित्र चरणी समर्पण !’

– सौ. श्‍वेता क्‍लार्क, फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक