‘हे गुरुराया, ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत असतांना युगानुयुगे झालेल्या अवतारांचे मला दर्शन झाले. या अवतारांच्या कार्याची झलक माझ्या डोळ्यांसमोर आली. ही झलक अनुभवतांना जे शब्द स्फुरले, ते तुमच्या चरणी अर्पण !
हे गुरुराया, प्रत्येक युगात तुम्ही ।
लुळ्या-पांगळ्यांचा मेळा गोळा करता ।
क्षमताहीनांना क्षमता देऊन ।
त्यांना जगज्जेता तुम्ही करता ॥ १ ॥
तुमची क्षमता असे अफाट ।
त्याचा थांगपत्ता ना कुणाला ।
म्हणून युगानयुगे अवतार ।
धारण करून जगज्जेता तुम्ही होता ॥ २ ॥
सत्ययुगात प्रल्हादाच्या माध्यमातून ।
सर्वत्र नारायण भक्ती पसरवली ।
हिरण्यकश्यपूच्या वधासाठी ।
नृसिंह अवताराने धर्माची पताका उजळवली ॥ ३ ॥
त्रेतायुगात रावणवधासाठी ।
वानरसेना तुम्ही एकवटली ।
वानरसेनेच्या साहाय्याने ।
देवभूमी लंका तुम्ही सोडवली ॥ ४ ॥
द्वापरयुगात बलशाली कौरवांसह ।
अधर्मियांचा नाश तुम्ही केला ।
बलशाली कौरवांना हरवण्या ।
पांडवांचा मेळा गोळा केला ॥ ५ ॥
कलियुगात निरीश्वरवाद्यांनी ।
धर्माला ग्लानी आणली ।
लुळ्या-पांगळ्या साधकांना घेऊन ।
तुम्ही धर्माची पताका रोवली ॥ ६ ॥
प्रत्येक युगात शत्रू बलशाली ।
असूनही तो परास्त झाला ।
लुळ्या-पांगळ्यांना क्षमता देऊन ।
त्यांचा उत्साह वाढवला ॥ ७ ॥
देवा (टीप) तुमच्यासारखा ।
देवांचा देव नाही या त्रिभुवनात ।
प्रत्येक कार्य पूर्णत्वास नेऊन ।
करता तुम्ही धर्मसंस्थापना ॥ ८ ॥
प्रत्येक युगात ना ना युक्त्या ।
अन् माया तुम्ही रचता ।
आम्हा पामरांना पुढे करूनी ।
स्वत: मात्र नामानिराळे रहाता ॥ ९ ॥
देवा किती वर्णावी तुमची थोरवी ।
हे शब्द सर्व फिके पडती ।
तुमच्या सान्निध्यात हे मन ।
केवळ तुमचे न् तुमचेच घडे ॥ १० ॥
आस बाळगतो हीच या मनी ।
जीवन व्यतीत व्हावे गुरुचरणी ।
मनात केवळ ध्यास रहावा ।
‘असावे तव चरणी’ केवळ ।
‘असावे तव चरणी’ ॥ ११ ॥
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले
॥ श्रीविष्णुचरणार्पणमस्तु ॥
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |