श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २३ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
या लेखाती मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857054.html
२ ए. देवता आणि पितर यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. विवाहाच्या विधींच्या वेळी सुपारी आणि श्रीफळ यांच्या रूपात देवतांची प्रतिष्ठापना करून विधी होत होते. या वेळी मला सुपारी आणि श्रीफळ यांच्या ठिकाणी देवतांचे अस्तित्व जाणवत होते. ‘विवाहाशी संबंधित देवता त्यांचे कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. नांदीश्राद्धाच्या वेळी पितरांबद्दल कृतज्ञता वाटून पितरांना प्रार्थना हाेत होती की, ‘तुमच्या कृपेमुळेच मी साधनेत येऊ शकले. या शुभकार्यात तुमचा आशीर्वाद लाभू देत. पुढील काळातही साधनेसाठी तुमचा आशीर्वाद लाभू देत’, अशा प्रार्थना माझ्याकडून होत होत्या. यापूर्वी पितरांच्या संदर्भातील विधी घरी केले जात होते. ‘त्यातूनही कोणत्या पूर्वजांचे काही राहिले असेल, तर आश्रमासारख्या पवित्र ठिकाणी त्यांचे विधी झाल्याने त्यांना गती मिळेल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असतील’, असे वाटून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. विधी पूर्ण झाल्यावर मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (क्रमश:)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |