उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. हिमानी महाकाळ ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. हिमानी महाकाळ उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. ‘पालकांनी तिच्यावर केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि भाव’ यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.११.२०२४)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कार्तिक कृष्ण षष्ठी (२१.११.२०२४) या दिवशी कु. हिमानी महाकाळ हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हिमानीची आई आणि एक साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. हिमानी महाकाळ हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. प्राची महाकाळ (कु. हिमानीची आई), खांदा कॉलनी, नवीन पनवेल, रायगड.
१ अ. वय – ७ ते ९ वर्षे
१ अ १. स्थिरता वाढणे : ‘पूर्वी हिमानीमध्ये पुष्कळ चंचलता होती. ती सतत धावपळ करत रहायची आणि अनावश्यक बोलायची. आता त्याचे प्रमाण न्यून झाले आहे आणि तिच्यातील स्थिरता वाढली आहे.
१ आ. वय – ९ ते ११ वर्षे
१ आ १. उत्तम निरीक्षणक्षमता : कु. हिमानीला स्वयंपाकघरातील विविध पदार्थ करायला आम्ही कुणी शिकवले नाही. निरीक्षण करून ती स्वतःच वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकली आहे.
१ आ २. प्रेमभाव : जेव्हा मी सेवेनिमित्त घराबाहेर असते, तेव्हा हिमानी तिच्या मोठ्या बहिणीला खाऊ बनवून देते. सेवा किंवा शिबिर यांसाठी सर्व साधक एकत्र जमतात. त्या वेळी हिमानी घरातील खाऊ घेऊन तेथे जाते आणि सर्व साधकांना देते.
१ आ ३. समाधानी वृत्ती : मोठ्या बहिणीला एखादी वस्तू घेतली, तर ‘मलाही ती वस्तू पाहिजे’, असे हिमानीचे गार्हाणे नसते.
१ आ ४. शिकण्याची वृत्ती : ‘प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धती’नुसार नामजपादी उपाय कसे शोधायचे ?’ हे हिमानीने शिकून घेतले आहे. एखादा वेगळा नामजप आल्यास ती तो लगेच वहीमध्ये नीट लिहून ठेवते आणि त्याप्रमाणे नामजप करण्यास आरंभ करते.
१ आ ५. सेवेची आवड
अ. गुरुपौर्णिमेच्या वेळी हिमानीकडे कार्यक्रमातील अभिप्रायपत्रके वाटण्याची सेवा होती. तेव्हा ती ‘सर्व जिज्ञासूंना अभिप्रायपत्रक कसे भरायचे ?’, याविषयी माहिती देत होती.
आ. सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा रायगडमध्ये दौरा होता आणि सर्व साधकांसाठी मार्गदर्शनही होते. त्या वेळी हिमानीही आमच्या समवेत सभागृहात आली. तिने मार्गदर्शन ऐकता ऐकता नोंदणीकक्षावर सेवाही केली.
१ आ ६. नेतृत्वगुण आणि क्षात्रवृत्ती : एकदा हिमानीच्या शाळेतील खेळाच्या मैदानामध्ये तिच्या वर्गातील काही मुली खेळत होत्या. त्याच वेळी तेथील मुलेही मैदानात मध्ये मध्ये फिरत होती. तिने २ – ३ वेळा मुलांना मध्ये न फिरण्याविषयी सांगितले; पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा तिने शिक्षकांना सांगितले; पण त्यांनीही लक्ष दिले नाही. नंतर तिने सर्व प्रकार वर्गशिक्षिकेला सांगितला. तेव्हा वर्गशिक्षिकेने संबंधित मुलांना शिक्षा केली.
१ आ ७. संतांप्रती भाव : एकदा आम्ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे जन्मस्थान असलेल्या नागोठणे, जिल्हा रायगड येथे स्वच्छतेची सेवा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा हिमानी एका खोक्यातील कागदपत्रे काढण्याची सेवा करत होती. तिला त्या खोक्यात प.पू. भक्तराज महाराज यांचे एक छायाचित्र सापडले. तिने ते संबंधित साधकांना विचारून घरी आणले. ती त्या छायाचित्रासमोर बसून प्रतिदिन नामजप करते.’
२. सौ. योगिता सावंत (साधिका), खांदा कॉलनी, पनवेल.
१. ‘कु. हिमानीमध्ये प्रेमभाव आहे. ती इतरांमध्ये सहज मिसळते. कुठेही भेटल्यावर ती धावत येऊन मला मिठी मारते.
२. हिमानी धाडसी आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १४.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.