‘कर्नाटकातील मालमत्तांवर मनमानीपणे दावा करणार्या वक्फ बोर्डाला मोठा झटका बसला आहे. प्रदीर्घ लढाईनंतर गदग जिल्ह्यातील शेतकर्यांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या भूमींचे मालकी हक्क परत मिळाले आहेत. मार्च २०१९ मध्ये वक्फ बोर्डाने राज्यातील गदग जिल्ह्यातील ३१५ शेतकर्यांच्या भूमींवर दावा केला होता. वक्फ बोर्डाकडून शेतकर्यांना नोटीस पाठवण्यात आली होती की, ते ज्या भूमीवर रहातात आणि शेती करत आहेत, ती भूमी वक्फ बोर्डाची असून शेतकर्यांनी त्यांवर अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे.’