‘मी फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरात सहभागी होण्यासाठी आले होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री गणेश मंदिराच्या समोरील लादीवर पाय ठेवले असता मला मृदूपणा जाणवला आणि जलतत्त्व जाणवले.
२. मी स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला त्या छायाचित्रामध्ये सजीवता जाणवली.
३. मला स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. मला त्या चित्रात जिवंतपणा जाणवला. ‘त्या चित्रातील श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे’, असे मला जाणवले.
४. मी दुसर्या दिवशी सकाळी ध्यानमंदिरात आरतीसाठी गेले. तेव्हा आरतीपूर्वी शंखनाद झाल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी आले आणि माझी भावजागृती झाली.
५. आश्रमात ज्या ज्या ठिकाणी साधक सेवा करतात, त्या ठिकाणी गेल्यावर मला परम पूज्यांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधील) गुरुतत्त्व जाणवले. मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवला. ‘मी जणू काही वैकुंठात आहे’, असे मला वाटले.’
– सौ. समिधा खोत, ईश्वरपूर, जिल्हा सांगली. (१.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |