Firecracker Ban : फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी का घातली जात नाही ? – सर्वोच्च न्यायालय

  • सर्वोच्च न्यायालयाने देहली सरकारला २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याची दिली समयमर्यादा !

  • कोणताही धर्म प्रदूषण करणार्‍या अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत नसल्याचेही केले विधान !

नवी देहली – देहलीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले. ‘राजधानीत वायू प्रदूषणाची समस्या कायम असतांना संपूर्ण वर्षभर फटाके फोडण्यावर बंदी का घातली जाऊ नये ?’, असा प्रश्‍न न्यायालयाने सरकारला विचारला. सध्या देहलीमध्ये ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सरकारला २५ नोव्हेंबरपूर्वी देहलीत वर्षभरात फटाके फोडण्यावर बंदी घालण्याविषयी निर्णय घेण्यास सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आमचे असे मत आहे की, कोणताही धर्म प्रदूषण करणार्‍या उपक्रमांना प्रोत्साहन देत नाही. अशा प्रकारे फटाके फोडले, तर त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देहली सरकारला देहलीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यासाठी काय पावले उचलली आहेत ?, याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.