काली सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. ‘वर्ष २०२५ च्या जानेवारीपर्यंत ही बंदी घातली गेली नाही, तर तीव्र आंदोलन करणार’, असेही त्यांनी घोषित केले आहे. एका धार्मिक संघटनेच्या प्रमुखांना अशा प्रकारे एका राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे, यातून अहिंदूंनी राज्याच्या सुरक्षेवर आणि तेथील बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी आव्हान उभे केले असण्याची शक्यता अधिक आहे.
उत्तराखंडमधील वनभूमीवर अनेक अनधिकृत थडगी आणि काही ठिकाणी मजारी उभारण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून शेकडो एकर सरकारी भूमी धर्मांधांनी गिळंकृत केल्या होत्या; मात्र भाजपच्या पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने या मजारी, थडगी यांवर बुलडोझर चालवून धर्मांधांचे सरकारी भूमीवरील अतिक्रमण मोडित काढले आणि भूमी मुक्त केली. अन्यथा ती भूमी कायमस्वरूपीच सरकारच्या हातून गेली असती. ही भूमी मिळवण्यासाठी सरकारला संघर्षही करावा लागला. काही ठिकाणी धर्मांधांच्या आक्रमकतेलाही सामोर जावे लागले. येथे धर्मांधांकडून हिंदु मुली, महिला यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांची अवस्थाही बिकट केली. काही मुलींना हिंदु संघटनांनी सोडवले, तर काहींना सोडवू शकले नाहीत. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील मूलनिवासी, म्हणजे आदिवासी मुलींना लग्नाचे आमीष दाखवून त्यांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्यात येते आणि नंतर त्यांच्या नावावर असलेली भूमी गिळंकृत करून त्यांचा छळ करण्यात आल्याच्याही घटना घडल्या आहेत. यातून कोणत्या प्रकारचे भयंकर षड्यंत्र धर्मांध हिंदूंचे अस्तित्व पद्धतशीरपणे संपवून आणि त्याद्वारे स्वत:ची संख्या वाढवण्यासाठी आखत आहेत, हे लक्षात येते. उत्तराखंडसह हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड येथेही अशीच काहीशी परिस्थिती आहे.
देवभूमीचे रक्षण हवे !
या घटनांपैकी ज्या माध्यमांद्वारे, सामाजिक माध्यमांद्वारे जनतेपुढे येतात, त्यांना जनतेकडून विरोध होतो; मात्र उघड न झालेल्या किती घटना असतील ? याचा विचारही करू शकत नाही. उत्तराखंडला देवभूमी म्हणतात; कारण येथे हिंदूंची ऋषिकेश, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांसारखी पुष्कळ पवित्र स्थाने आहेत. हिमालयाच्या जवळ असलेली ही हिंदूंची तपोभूमी, उपासनाभूमी आहे. याच भूमीवर धर्मांध नाना प्रकारे उच्छाद मांडून जर हिंदूंच्या उपासनेत भंग करत असतील, तर निश्चितपणे महामंडलेश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांच्या मागणीवर विचार झाला पाहिजे. त्यांनी काही क्षुल्लक कारणावरून अशी मोठी मागणी करण्याची शक्यता नाही. पाणी डोक्यावरून वहाण्यास प्रारंभ झाला असल्यामुळे ही मागणी केली असण्याची शक्यता अधिक आहे. एकप्रकारे हिंदूंची उपासनाभूमी पवित्र आणि आक्रमणांपासून मुक्त ठेवण्याची त्यांची भूमिका यातून स्पष्ट होते. अन्य धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी कधी हिंदूंकडून असे प्रकार झाले आहेत का ? हिंदू तसा विचारही करणार नाहीत. धर्मांध मात्र हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक ठिकाणीच, नव्हे प्रत्येक प्रसिद्ध मंदिराला खेटून त्यांच्या मशिदी उभारत आहेत. यातून धर्मांधांचा हेतू स्पष्ट आहे. धर्मांध छुप्या रितीने, कपटाने, फसवून हिंदूंच्या धार्मिक स्थळी प्रवेश मिळवून, तेथील सात्त्विकता आणि शुद्धता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्यापक षड्यंत्र !
उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध कावड यात्रेच्या मार्गात जी पूर्णपणे हिंदु धर्मियांची आहे, त्यामध्ये धर्मांध दुकानदार त्यांची दुकाने थाटून हिंदूंना वस्तू विकत देत. यामध्ये नुकतेच उघड झालेली थूंक जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद यांसारख्या जिहादच्या अनेक घटना उघडकीस आल्या. ज्या श्रद्धेने, तळमळीने हिंदु अनुष्ठान करतो, उपासना करतो, त्यांना भ्रष्ट करण्याचे काम हे जिहादी घटक एका व्यापक षड्यंत्राद्वारे शांतपणे करत आहेत. त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने चांगली पावले उचलली आहेत. तशाच कठोर उपाययोजना अन्य राज्यांमध्येही करण्याची आवश्यकता आहे. महामंडलेश्वर आनंद स्वरूप महाराज यांनी उत्तराखंडला काश्मीर बनण्यापासून वाचवायची आवश्यकताही प्रतिपादित केली आहे. धर्मांधांची संख्या अधिक झाल्यास काय होणार, याची चांगली जाण स्वामीजींना आहे. त्यातून त्यांनी हिंदूंना सावध केले आहे. मुख्य म्हणजे अगदी गर्दीच्या प्रदेशांवर धर्मांधांचे लक्ष्य आहेच, त्याचसमवेत विरळ लोकवस्तीच्या ठिकाणीही अथवा जेथे विशेष वावर नाही, अशा ठिकाणी तर त्यांचा भूमी जिहाद करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील स्थिती सांगतांना यू ट्यूबरने माहिती दिली की, तेथे येणार्या सर्व रस्त्यांच्या प्रारंभी धर्मांधांनी मशिदी आणि मजारी उभारलेल्या दिसत आहेत, म्हणजे उद्या काही गडबड झाल्यास हे रस्तेच धर्मांध बंद करून हिंदूंची हानी करू शकतात. नवी मुंबई विमानतळाजवळील एका उंच टेकडीवर एक दर्गा उभारल्याचे काही राष्ट्रप्रेमींना लक्षात आले. या ठिकाणाहून नवी मुंबई विमानतळ आणि आसपासचे मुख्य महामार्ग यांवर लक्ष्य ठेवणे, हे अगदी सहज सोपे आहे. यातून भविष्यात या प्रदेशात काही गुप्त कारवाया धर्मांध आखून येथील परिस्थिती अस्थिर करतील, हिंदूंसाठी असुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी स्थिती असेल. या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने प्रशासनाने काही पावले उचलली आहे; मात्र येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, जी गोष्ट काही राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना कळते, ती एवढी मोठी यंत्रणा असलेल्या प्रशासन, पोलीस यांना का कळत नाही ? एवढा गाफीलपणा हाच धर्मांधांच्या पथ्यावर आजवर म्हणजे गत काही शेकडो वर्षे पडलेला आहे.
हिंदूंमधील या बेसावधपणाचा लाभच त्यांनी घेतला आहे. नुकतीच सोमनाथ मंदिराजवळ अनधिकृत मशीद, दर्गे यांवर गुजरात सरकारने मोठी कारवाई केली. अनुमाने दीड वर्षापूर्वी बेट द्वारकेला लागून असलेल्या समुद्रातील बेटावरील अवैधपणे उभारलेले शेकडो दर्गे, थडगी, मदरसे आणि मशिदी गुजरात सरकारने बुलडोझरने पाडल्या. मुख्य म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येत ही अवैध बांधकामे होत असतांना प्रशासन आणि पोलीस यांना काहीच कल्पना कशी येत नाही ? म्हणजे त्यांची अकार्यक्षमता, निष्क्रीयता तर आहेच, त्यासह स्थानिकही त्यांच्यात सहभागी असणार, हे लक्षात येते. यामुळेच हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी, तीर्थयात्रा, मंदिरे, मठ येथे अहिंदूंना प्रवेश नाकारणे आवश्यक बनल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत आहे. सरकारने त्याकडे प्राधान्याने लक्ष देऊन उपाय काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदूंच्या अस्तित्वावरच संकट येऊ शकते !
एका राज्यात अहिंदूंना प्रवेश नाकारण्याची झालेली मागणी ही हिंदूंपुढे संकटे वाढल्याचे निदर्शक ! |