प्रेमळ आणि बहिणींना साधनेत साहाय्य करणार्‍या कोची, केरळ येथील सुश्री (कु.) सुप्रिया सुखठणकर ! 

सुश्री (कु.) सुप्रिया सुखठणकर (कोची, केरळ) हिची तिच्या बहिणीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सुश्री (कु.) सुप्रिया सुखठणकर

१. साधी राहणी  

‘सुप्रिया एका मोठ्या आस्थापनात चांगल्या पदावर कार्यरत आहे; परंतु त्याविषयी ती कधीही कुणालाही जाणवू देत नाही. तिचे राहणीमान साधे आहे.

२. प्रेमभाव  

सुप्रिया आमच्या कोची येथील घरी रहाते. तिला लहान मुले पुष्कळ आवडतात. ती लहान मुलांमध्ये रमते. कोची सेवाकेंद्रात रहाणारा कु. राघव लुकतुके दहाव्या इयत्तेत शिकत आहे. तो आमच्या घरी अभ्यास करण्यासाठी जातो. त्या वेळी सुप्रिया कितीही व्यस्त किंवा दमली असली, तरीही ती राघवचा अभ्यास मनापासून घेते.

३. बहिणींना साधनेत साहाय्य करणे  

सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर

अ. काही दिवसांपूर्वी मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. त्या वेळी सुप्रिया मला समजून घेत होती. तिला काही विचारल्यास ‘ती मला साधनेच्या दृष्टीने कसे असायला हवे ?’, याविषयी सांगत असे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत होते.

आ. मी आणि माझी धाकटी बहीण (कु. अिदती सुखठणकर) केरळ येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहातो. सुप्रिया आणि आई घरी रहातात. एकदा घरी अडचण आली होती. आम्ही दोघीही सेवेत व्यस्त होतो. आम्ही सुप्रियाला घरी येण्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘तुम्ही सेवा करा. मी येथील पहाते.’’ काही गंभीर गोष्ट असेल, तरच ती आम्हाला घरी बोलावते. ती आम्हाला करत असलेल्या साहाय्यामुळे आम्ही सेवाकेंद्रात राहून साधना करू शकतो.’

मला साधनेत साहाय्य करणारे कुटुंब मिळाल्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर (कु. सुप्रिया यांची मोठी बहीण), कोची, केरळ. (२०.८.२०२४)