उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कृष्णप्रिया पी.ए. ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
‘माझा गर्भारपणात सतत नामजप होत होता. तेव्हा गर्भ नामजपाला प्रतिसाद देत असे.
२. जन्मानंतर
२ अ. चांगली स्मरणशक्ती : कृष्णप्रियाला अभ्यासाची आवड आहे. तिने धडे एकदाच वाचले, तरी तिच्या लक्षात रहाते.
२ आ. ती मला घरकामात साहाय्य करते, उदा. घरात स्वच्छता करणे.
२ इ. सेवेची तळमळ : कृष्णप्रिया ६ – ७ वर्षांची असतांना मी सेवेला जातांना ‘तिलाही समवेत घेऊन जावे’, यासाठी ती रडत असे. मी माझ्या आईकडे (सौ. आशा बालकृष्ण यांच्याकडे) रहायला गेल्यावर ती माझ्या आईच्या समवेत दिवसभर अध्यात्मप्रचाराच्या सेवेसाठी जात असे. ती सत्संगात शांतपणे बसून रहात असे. ती सत्संगाच्या सिद्धतेसाठी साहाय्य करत असे. ती माझ्या समवेत सेवेला आल्यावर मला साहाय्य करते.
२ ई. गुरुंप्रती भाव : ती सकाळी गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पाहून प्रार्थना करते. ती रात्री झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील एक ग्रंथ जवळ ठेवते. ती रात्री कृतज्ञता व्यक्त करून झोपते. ‘गुरु आमचे रक्षण करतात’, असा तिचा भाव आहे.
३. कृष्णप्रियामधील स्वभावदोष : हट्ट करणे.’
– सौ. अनुप्रिया (आई), कन्नूर, केरळ. (१३.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.