मुंबई – अनिल देशमुख मुंबई उच्च न्यायालयातून जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयाने त्यांच्यावर निर्बंधही लादले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतांना अशा वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेविषयी स्वत:च्या आत्मचरित्रात लिखाण करून अनिल देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे २९ ऑक्टोबर या दिवशी केली आहे. ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर – राजकीय षड्यंत्र उलथवून टाकणार्या गृहमंत्र्यांची आत्मकथा’, हे स्वत:चे आत्मचरित्र अनिल देशमुख यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केले आहे.