सानपाड्यात मशीद बांधण्यास जो विधानसभेचा उमेदवार तीव्र विरोध करील, त्यालाच आम्ही मतदान करू !

‘अखिल सानपाडा रहिवासी महासंघा’चा धडाडीचा आणि अभिनंदनीय निर्णय !

आंदोलन करतांना सानपाडा येथील स्थानिक नागरिक

नवी मुंबई – ‘जो विधानसभेचा उमेदवार आपण सानपाड्यात मशीद बांधू देणार नाही, असे जाहीर आश्वासन देईल, त्यालाच आम्ही मतदान करू’, अशा घोषणा देत सानपाडा येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती ‘अखिल सानपाडा रहिवासी महासंघा’चे सचिव संतोष पाचलग यांनी दिली आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या सानपाडा परिसरात स्थानिक हिंदु रहिवाशांनी या परिसरात मशीद बांधू देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशातील गोरखनाथ मठात धार्मिक घोषणा देत प्राणघातक आक्रमणे करणारा, आयआयटी मुंबईहून पदवीधारक झालेला धर्मांध आतंकवादी अब्बास मूर्तजा हा सानपाड्यातच पकडण्यात आला, पोलिसांनी नंतर त्याला मनोरुग्ण घोषित केले, हे सानपाड्याचे पोलीस सोयीस्कर विसरतात काय ?

मशिदीला विरोध करणे, हा न्यायालयाचा अवमान, तर मशिदीवर ध्वनीक्षेपक लावणे, हा न्यायालयाचा अवमान नाही का ? – सानपाडा रहिवासी संघाचा प्रश्न

यापूर्वी ७ एप्रिल २०२२ या दिवशी सानपाडा परिसरातील बहुसंख्य हिंदूंनी एकत्रित येत मशीद बांधण्यासाठी भूखंड वाटप केल्याविषयी सिडकोचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय उपोषण केले होते. सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष जावेद खान यांनी हा भूखंड मशिदीसाठी दिला होता, तसेच स्थानिक हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर ‘मशीद अन्य ठिकाणी बांधण्यात येईल’, असे त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते; मात्र ही माहिती न्यायालयात सादर करण्यात आली नव्हती. नंतर न्यायालयाने या मशिदीला अनुमती दिली. ‘आता मात्र उपोषण करू नका, उपोषण करणे न्यायालयाचा अवमान ठरेल’ असा अजब दावा पोलिसांनी केला आहे. ‘न्यायालयाच्या आदेशानंतरही इतर मशिदींवरील ध्वनीक्षेपक अजून का काढले जात नाहीत ? हा न्यायालयाचा अवमान नाही का ? ’, असा प्रश्न महासंघाचे सदस्य संतोष पाचलग यांनी पोलिसांना केला आहे.

पोलिसांनी हिंदूंवर कारवाई केली, तर हिंदू स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण जिथे अतिरेकी धर्मांध आहेत, त्या धर्मांधतेला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. ६० सहस्र हिंदू आणि २०० मुसलमान असलेल्या भागात मशिदीसाठी भूखंड देणे अयोग्य आहे. – संतोष पाचलग, सानपाडा रहिवासी संघ

संपादकीय भूमिका :

विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडे कशा मागण्या कराव्यात, हे सानपाडावासियांकडून शिकणे आवश्यक !