‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद) आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत) यांना) श्रीविष्णूच्या वेगवेगळ्या नामधुनी (देवतांचे स्तुतीपर, स्वरबद्ध आणि लयबद्ध संकीर्तन ) सिद्ध करायच्या होत्या. या नामधुनी शोधून त्या चालीत बसवून म्हणणे, नंतर त्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ऐकवून त्या अंतिम झाल्यावर त्यांचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करणे इत्यादी सेवा करायच्या होत्या. या सोहळ्यासाठी आम्ही ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’, ‘हरि सुंदर नंद मुकुंदा…’, ‘जय जय माधवम् …’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय…’, ‘श्रीराम जय राम जय जय राम….’, ‘नारायणम् भजे नारायणम् …’ आणि ‘लक्ष्मी-विष्णवे नमो नम:…’ अशा एकूण ७ नामधुनी सिद्ध केल्या. ही सेवा करतांना आम्हाला आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ब्रह्मोत्सवासाठी नामधुनी निवडून त्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्यावर त्या दोघींनाही सगळ्याच नामधुनी आवडणे
‘ब्रह्मोत्सवासाठी नामधुनी बसवण्याची सेवा करायची आहे’, असा निरोप मिळाल्यावर आम्ही दोघींनी ‘कुठल्या नामधुनी घेऊ या ?’, असा विचार करून काही नामधुनी निवडल्या आणि त्या भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्या. त्या दोघींनाही सगळ्याच नामधुनी पुष्कळ आवडल्या.
२. आवाज लगेच जुळणे आणि कुठल्याही अडचणी न येता निवडलेल्या नामधुनी लवकर सिद्ध होऊन त्यांचे ध्वनीमुद्रणही सहजतेने होणे
या नामधुनी गातांना आमचा (माझा आणि माझी बहीण तेजल यांचा) आवाजही लवकर जुळत होता. एरव्ही आमचा आवाज जुळायला थोडा वेळ लागतो.
ब्रह्मोत्सवानिमित्त निवडलेल्या सातही नामधुनी देवाच्या कृपेने फार लवकर सिद्ध झाल्या. त्यांचे ध्वनीमुद्रण करतांना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्यांचे संकलन फारसे करावे लागले नाही आणि त्यात सुधारणाही फार अल्प होत्या.
३. ‘ब्रह्मोत्सवानिमित्त निवडलेल्या ७ नामधुनींपैकी २ नामधुनी आणि १ गीत यांमध्ये आपोआपच ‘सच्चिदानंद’ हा शब्द होता. ‘ही त्या सच्चिदानंदाचीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच) कृपा आहे’, असे आम्हाला जाणवले.
४. शब्दोच्चार सुस्पष्ट होणे
वर्ष २०२२ मधील जन्मोत्सवाच्या वेळी नामधुनी म्हणतांना आमचे शब्दोच्चार सुस्पष्ट होत नव्हते; परंतु या वर्ष २०२३ मधील रथोत्सवासाठी देवाच्या कृपेने नामधुनी म्हणतांना आमचे शब्दोच्चार आपोआपच सुस्पष्ट झाले.’
(क्रमश:)
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), बी.ए. संगीत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849110.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |