१. डॉ. चैतन्य सुकदेव देवरे (जिल्हाप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र.
अ. ‘मी आश्रमात आल्यावर मला देवयुगात आल्यासारखे वाटले.
आ. इथे पावित्र्य, आपुलकी, सुसूत्रता आणि सात्त्विकता बघायला अन् अनुभवायला मिळाली.’
२. सौ. मीना दीपक पाठक (कोषाध्यक्ष, श्री अंबादेवी संस्थान), अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘येथील स्वच्छता बघून माझे मन प्रसन्न झाले.
आ. आश्रमात साक्षात् गुरूंचे दर्शन झाल्यासारखे वाटले.
इ. आश्रम पाहून आम्हाला चांगली प्रेरणा मिळाली.’
३. श्री. हसमुखभाई शाह (विश्वस्त, श्री राधाकृष्ण मंदिर), कोल्हापूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात चालणारे कार्य अवर्णनीय आहे.
आ. येथील वातावरण फारच सुंदर, अत्यंत सात्त्विक आणि पवित्र आहे.’
४. श्री. व्यंकटराव पनाळे (संपादक, ‘लोकाधिकार न्यूज’), लातूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील असे पवित्र वातावरण आध्यात्मिक शक्तीमुळे निर्माण झाले आहे.
आ. प्रत्येकाने साधना केल्यास समाजाचे शुद्धीकरण झाल्याविना रहाणार नाही.’
५. श्री. विलास निंबा कुमावत (साहाय्यक प्राध्यापक, उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय), जळगाव, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम अाणि साधक’, हे आई-मुलाचे नाते आहे.’
६. श्री. विक्रम सुभाष फाळके (विश्वस्त, रामेश्वर मंदिर), भुकुम, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘मला एक वेगळी ऊर्जा मिळाली.
आ. ‘आश्रमाविषयीची माहिती आपले कुटुंबीय आणि इतर मित्रमंडळी इत्यादींना सांगून त्यांना आश्रम दाखवायला घेऊन यावे’, असे मला वाटले.
इ. ‘आपल्या धर्माचे जतन आणि पालन व्हावे’, ही भावना पुष्कळ आवडली.’
७. श्री. जितेंद्र प्रकाश मोरे (अध्यक्ष, शिव आरती संघटन), बुलढाणा, महाराष्ट्र.
अ. ‘आपला आश्रम पाहून त्याचा आदर्श घ्यावा’, असे मला वाटले.
आ. ‘आश्रमातील चैतन्यमय वातावरण प्रत्येकाच्या घरात असावे’, असे वाटते.’
८. प्रा. डॉ. विठ्ठल सोनटक्के (कीर्ती महाविद्यालय), मुंबई, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात अत्यंत स्वच्छता असून शिस्तबद्ध कार्यपद्धत आहे.
आ. येथे मला गुरुतत्त्वाचा अनुभव आला.
इ. आश्रमात आल्यावर मला चैतन्य आणि शांती यांची अनुभूती आली.’
९. श्री. श्रीधर शशिकांत भाडळकर (विश्वस्त, दत्त मंदिर), राजापूर, सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘आध्यात्मिक प्रगती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी मला मोठी प्रेरणा मिळाली.
आ. साधकांनी लिहिलेल्या चुकांचा फलक पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.६.२०२४)