धारावी पुनर्विकासाचे भूमीपूजन गुपचूप केल्याचे प्रकरण
मुंबई – धारावी पुनर्विकासाचे भूमीपूजन गुपचूप केल्याने अदानी समूह, धारावी ‘रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ (डी.आर्.पी.पी.एल्.) विरोधात धारावीकर संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’ने घेतला आहे. त्यानुसार आठवड्याभरात धारावी बचाव आंदोलनाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यात आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याविषयीचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.