Karnataka Police Instructions For Eid : १६ सप्‍टेंबरला होणार्‍या ईदच्‍या मिरवणुकीत मुसलमानांनी धारदार वस्‍तू न आणण्‍याचे निर्देश !

बेंगळुरू पोलिसांच्‍या मार्गदर्शक सूचना जारी

बेंगळुरू (कर्नाटक) – मंड्या जिल्‍ह्यातील नागमंगल गावात गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्‍या आक्रमणाच्‍या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांना ‘ईद-मिलाद’ साजरा करण्‍यासाठी बेंगळुरू पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत. १६ सप्‍टेंबर या दिवशी असणार्‍या या मिरवणुकीत धारदार वस्‍तू आणल्‍या जाऊ नयेत, असे पोलिसांकडून सांगण्‍यात आले आहे. ‘मार्गदर्शक सूचनांचे पालन केले गेले नाही, तर कारवाई करण्‍यात येईल’, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचना

१. मिरवणुकीत सहभागी होणार्‍यांकडे कोणतीही धारदार वस्‍तू असू नये.

२. मिरवणुकीच्‍या वेळेत कोणत्‍याही कारणाने ‘डी.जे.’चा (मोठ्या ध्‍वनीक्षेपक यंत्रणेचा) वापर करू नये.

३. देखाव्‍यामध्‍ये कोणतेही उत्तेजक घटक नसावेत.

४. कोणत्‍याही पूजास्‍थळाच्‍या (मंदीर/चर्च यांच्‍या) समोर घोषणा करू नये. (यातून हिंदूंना हिंसक ठरवण्‍याचा छुपा प्रयत्नच बेंगळुरू पोलिसांनी चालवला आहे, हे स्‍पष्‍ट आहे. हिंदू कधीच त्‍यांच्‍या मंदिरासमोरून मुसलमानांची मिरवणूक गेली, तर त्‍यास विरोध करत नाहीत. याच्‍या उलट भारतात कुठेही एखाद्या मशिदीसमोरून हिंदूंची धार्मिक मिरवणूक गेल्‍यास त्‍यावर दगडफेक, पेट्रोल बाँब, तलवारी आदींनी आक्रमण केले जाते ! – संपादक)
५. मिरवणुकीच्‍या वेळी आयोजकांनी कोणत्‍याही वीज जोडणीस समस्‍या येऊ न देणे आवश्‍यक आहे.

६. मिरवणुकीच्‍या वेळी आयोजकांनी आग विझवणारे साहित्‍य ठेवावे.

७. रात्री मिरवणूक संपल्‍यानंतर दुचाकींवर दोनपेक्षा अधिक व्‍यक्‍तींसह दुचाकी वाहने चालवू नये. (याचा अर्थ मुसलमान अशा मिरवणुकांच्‍या वेळी वाहतुकीचे सर्व नियम धाब्‍यावर बसवतात, हे स्‍पष्‍ट आहे ! – संपादक)

८. ज्‍येष्‍ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि अन्‍य यांना अडचण येऊ नये; म्‍हणून ध्‍वनीक्षेपक यंत्रणांचा वापर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच करावा.

९. ध्‍वनीक्षेपक यंत्रणांचा वापर करण्‍यासाठी स्‍थानिक पोलिसांची अनुमती घेणे आवश्‍यक आहे.

संपादकीय भूमिका

यातील किती सूचना पाळल्‍या जातील, हा प्रश्‍नच आहे. मुळात ईदच्‍या मिरवणुकीत धारदार वस्‍तू न आणण्‍याची सूचना द्यावी लागते, यातच सर्वकाही आले. यासह हिंदूंच्‍या सणांच्‍या वेळीही धर्मांध मुसलमान तलवारीसारख्‍या धारदार वस्‍तू बाळगतात, हेसुद्धा विसरून कसे चालेल ?