हॉटेल व्यावसायिकाकडून १ कोटी रुपयांची लाच घेतली
पुणे – महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाला मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची लाच घेतली. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक केली आहे. याविषयी गुन्हा नोंद झाल्यानंतर कोल्हापूरे पसार झाले होते. गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांना ठाणे येथून अटक केली. महाबळेश्वर येथे हेमंत साळवी यांचे ‘मेघदूत’ हॉटेल आहे. ‘या हॉटेलसाठी मद्यविक्रीचा परवाना मिळवून देतो’, असे सांगून कोल्हापूरे यांनी मित्र हनुमंत मुंडे, अभिमन्यू देडगे, बाळू पुरी यांच्या साहाय्याने अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १ कोटी ५ लाख रुपये घेतले. मद्यविक्रीचा परवाना मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर स्वत:ची फसवणूक झाल्याचे पाहून साळवी यांनी पुणे येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकामोठ्या पदावरील पोलीस अधिकारीच जर भ्रष्टाचारी असतील, तर गुन्हेगारी कधी तरी संपेल का ? |