दिघी (पिंपरी) पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढतांना पोलिसांना मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या ज्यूसच्या (फळांच्या रसाच्या) ३ गाड्या, टेंपो आणि दुचाकी यांवर अतिक्रमण विभागांकडून कारवाई केली जात होती. या कारवाईला विरोध करत कुटुंबातील ३ जणांनी अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांना शिवीगाळ केली. पोलिसांनाही मारहाण केल्याचा हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यासमोर घडला. या प्रकरणी कंठाराम दामोदर, आशिष दामोदर आणि नलूबाई दामोदर यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यावरून पोलिसांना प्रशिक्षण दिले जात नाही का ?, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो !