हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

भारताचार्य पू. प्रा. सुरेश शेवडे

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.             

लेखांक क्र. ४६ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831538.html

(लेखांक ४७)

१२. गायीच्या शेणाचे महत्त्व

गाय हा एकच प्राणी जगात असा आहे की, जिचे शेण आणि मूत्र मनुष्य औषध म्हणून तोंडाने प्राशन करतो. गायीच्या शेणातील एक गुण प्रयोग करून पहाण्यासारखा आहे. पांढरे स्वच्छ कपडे एक घंटा शेणाच्या कालवणात (पाण्यात शेण घालून चांगले एकरूप करून घ्यावे) बुडवून ठेवावे. एका घंट्याने स्वच्छ पाण्याने २ – ३ वेळा खळबळून घ्यावेत. अगदी स्वच्छ निघतात. ते उन्हात वाळवल्यास त्यांना वासही येत नाही.

१३. गायीच्या दुधाचे विविध उपयोग

अ. डोळे आले असतांना पांढर्‍या गायीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

आ. काविळीवर काळ्या गायीचे दूध अत्यंत उपयुक्त ठरते.

इ. गोदुग्ध हा पूर्ण आहार आहे. केवळ गायीच्या दुधावर मनुष्य जगू शकतो.

ई. पंडित मदनमोहन मालवीय हे केवळ गोदुग्धावर रहात होते. यामुळे त्यांचे पांढरे झालेले केस काळे झाले होते.

उ. नवजात बालकाला पहिल्या ४८ घंट्यांत आईचे दूध पचत नाही, त्या वेळी त्याला गायीचे दूध द्यावे, ते चांगले पचते.

ऊ. ‘गोवर्धन’ मासिकात श्री. माणिक सीताराम देवडीकर यांनी गोदुग्धाने आपला अर्धांगवायू हा रोग बरा झाल्याचा अनुभव दिला आहे.

ए. गोमूत्राने क्षय बरा होतो.

ऐ. ल.रा. पांगारकर यांचा अनुभव – गोदुग्धाने कर्करोगावर (कॅन्सरवर) उपचार होऊ शकतो.

ओ. उदररोगासाठी पुनर्नवा काढ्यासमवेत निम्म्या प्रमाणात (अर्धा भाग पुनर्नवा काढा आणि अर्धा भाग गोमूत्र) गोमूत्र उपयोगी पडते.

औ. फेफरे (फीट) येणार्‍याला प्रतिदिन २ चमचे गोमूत्र द्यावे.

अं. गोमूत्राने पोटातील कृमी (जंत) नाहीशा होतात.

क. जलोदरावर गोमूत्राचा उत्तम परिणाम आढळून आला आहे.

ख. लहान मुलास मुडदूस झाल्यास अंगाला गोमूत्र चोळून सकाळी कोवळ्या उन्हात बसवावे.

ग. इसबावर प्रतिदिन गोमूत्राचा प्रयोग करावा.

घ. गोमूत्राने दमा बरा होतो. कफविकारावर गोमूत्र प्रभावी आहे.

संशोधनात आढळून आले आहे की, गोमूत्र आणि शेण या वस्तूंत मेंथॉल, अमोनिया, फिनोल, इंडोल आणि फॉर्मेलिन ही द्रव्ये आहेत. गायीच्या दुधात १ घन से.मी. मध्ये ५ ते १० लक्ष आणि तेवढ्याच दह्यात ५ ते १० कोटी शरीरसंरक्षक सूक्ष्म जिवाणू (बॅक्टेरिया) आढळले आहेत; म्हणूनच ‘भोजनान्ते पिबेत् तक्रम् ।’ म्हणजे ‘भोजनाच्या शेवटी ताक प्यावे’, असा भारतीय आयुर्विज्ञानाचा आदेश आहे. जेवणानंतर ताक प्यावे.

१४. गायी-म्हशीच्या दुधांतील भेद !

वरीलपैकी कॅरोटिन आणि झॅल्योफिल ही द्रव्ये ज्ञानतंतूंना चेतना देतात अन् ती मन, बुद्धी, धारणशक्ती, प्रज्ञावर्धक आहेत. ती इतर कोणत्याही प्राण्याच्या दुधात नाहीत. त्यामुळेच गायीच्या दुधात पिवळेपणा असतो.

(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

लेखांक क्र. ४८ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831933.html