|
सुळ्या (कर्नाटक) – येथील कोल्लमोग्रु गावात लव्ह जिहादद्वारे(Love Jihad) हिंदु तरुणीला पळवून नेण्याचा मुसलमान तरुणाचा डाव एका बसवाहकाच्या दक्षतेमुळे फसला.
१. सवणूरमधील महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर १८ वर्षांच्या दीक्षाने पुढील शिक्षणासाठी परदेशात जात असल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगितले. तिचे माता-पिता निरक्षर असल्याने त्यांचा यावर विश्वास बसला.
२. ‘माझ्या २ मैत्रिणी बेंगळुरूमध्ये रहात असून त्या बेंगळुरूतील केंपेगौडा विमानतळावर मला निरोप देण्यासाठी आल्या आहेत’, असे तिने तिच्या पालकांना सांगितले होते. त्यानुसार विमानतळावर मैत्रिणींना भेटल्यावर दीक्षा नंतर विमानतळाच्या आत गेली. विशेष म्हणजे दीक्षाने तिच्या मैत्रिणींना ‘माझे आई-वडील जिवंत नाहीत’, असे सांगून त्यांच्याकडून पैशांचे साहाय्य घेतले होते, असेही म्हटले जात आहे.
३. थोड्या वेळाने दीक्षा विमानतळातून बाहेर आली आणि ती पुन्हा बसमध्ये बसली. या वेळी तिच्या समवेत एक मुसलमान तरुण होता. या बसच्या वाहकाला याविषयी संशय आला. त्याने दीक्षाचे छायाचित्र काढून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना पाठवले. या कार्यकर्त्यांनी ते व्हॉट्सअॅप गटात प्रसारित झाल्यावर दीक्षाची ओळख पटली. नंतर तिच्या पालकांना याविषयी सांगण्यात आले. पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली.
४. पोलीस उपनिरीक्षक कार्तिक यांनी सुळ्यापासून ५५० किमी अंतरावर असलेल्या बेंगळुरूच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याचे सुचवले होते आणि तेथे तक्रार प्रविष्ट न झाल्यास त्यांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बेंगळुरूला गेलेल्या दीक्षाच्या पालकांनी उप्पारपेटे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दीक्षाला शोधून काढले आणि तिला पालकांच्या स्वाधीन केले.