हुपरी येथील ‘मुस्लीम सुन्नत जमियत’च्या वतीने उभारण्यात आलेल्या अवैध मदरशाचे प्रकरण
कोल्हापूर, २७ ऑगस्ट (वार्ता.) – हुपरी येथील ‘मुस्लीम सुन्नत जमियत’च्या वतीने उभारण्यात आलेल्या अवैध मदरशावर तात्काळ कारवाई करण्याविषयी दिलेले निवेदन आणि न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून याविषयी निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले. याविषयी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
१. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे. या ठिकाणी वीज, पाणी यांची जोडणी असून कूपनलिकाही खोदण्यात आली आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.
२. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी २ ऑगस्ट २०२४ या दिवशी हुपरी येथील मुख्याधिकार्यांना हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करा, असे लेखी पत्र दिलेले असतांनाही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी या संदर्भात तात्काळ कार्यवाही होण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या जाव्यात आणि या मदरशाचे अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे आणि जिल्हा सहआयुक्त श्री. नागेंद्र मुतकेकर यांना २६ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.
३. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे, श्री. सनद आवटे, श्री. शिवराज यादव उपस्थित होते.