साकार झाले हिंदु राष्ट्र सूक्ष्मातून मनामनात।

हिंदु राष्ट्राचा पांचजन्य शंखनाद झाला वैश्विक महोत्सवात।
संपूर्ण विश्वाला दिला संदेश हिंदु राष्ट्राच्या जयघोषात।। १।।

श्री. गुरुप्रसाद गौडा

मने एकरूप झाली, हृदये फुलली, हिंदु राष्ट्राच्या ध्येयात।
हिंदु राष्ट्र सोडून अन्य विचार नाही कुणाच्या मनात।। २।।

विचारमंथन झाले क्षात्रभावात।
अन् संतांचे दिशादर्शन झाले ब्राह्मतेजात।। ३।।

धर्म-अधर्मातील युद्ध हे, कुठे आहे अधर्माला जय ?।
सत्यधर्माचे युद्ध असे, असत्याला कुठे आहे स्थान ?।। ४।।

हिंदु राष्ट्राच्या शंखनादाच्या प्रतीक्षेत आहे हिंदु समाज।
रामराज्याची घेईल अनुभूती सत्त्वप्रधान हिंदु समाज।। ५।।

राष्ट्रनिर्मितीचे धर्मकार्य साकार होत असे पृथ्वीवर।
या हिंदूंनो धर्मपक्षाकडे, त्यातच आहे आपुला उद्धार।। ६।।

रात्र संपली, पहाट झाली, संचार शक्तीचा होईल।
अधर्म नष्ट होऊन आता केवळ धर्मच राहील।। ७।।

सार्थक झाले मनुष्यजन्माचे गुरुचरणांच्या सेवेत।
धन्य धन्य झालो आम्ही गुरुकृपेच्या वर्षावात।। ८।।

– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४३ वर्षे), राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक. (११.७.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक