देशात ३० वर्षांनंतर गृहयुद्ध चालू झाल्यावर हिंदू जगू शकणार नाहीत ! – MP Minister Kailash Vijayvargiya

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे मंत्री विजयवर्गीय यांचे निवृत्त सैन्याधिकार्‍याचा संदर्भ देत विधान !

मध्यप्रदेशातील मंत्री कैलास विजयवर्गीय

इंदूर (मध्यप्रदेश) – आजच्या काळात सामाजिक सलोखा पार महत्त्वाचा आहे. काल मी एका निवृत्त सैन्याधिकार्‍यांना भेटलो. ता सामाजिक कार्यात फार सक्रीय आहेत. ते म्हणाले, ‘३० वर्षांनंतर या देशात गृहयुद्ध चालू होईल आणि ३० वर्षांनंतर अशी तुम्ही लोक जगू शकणार नाहीत.’ या विषयावर आपण विचार आणि चिंतन केले पाहिजे. हिंदु शब्द बळकट करण्याचे काम केले पाहिजे, असे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी केले. ‘सामाजिक समरसता रक्षाबंधन उत्सव’ या नावाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विजयवर्गीय पुढे म्हणाले की, ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांच्या धोरणानुसार खुर्ची मिळवण्यासाठी काही लोकांना जातीच्या आधारावर हिंदु समाजात फूट पाडायची आहे.

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर केंद्र आणि भाजपशासित राज्य सरकारे यांनी आताच पावले उचलणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘विजयवर्गीय यांचे विधान दायित्वशून्यतेचे !’ – काँग्रेसची टीका

मध्यप्रदेश राज्याचे काँग्रेसचे प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी विजयवर्गीय यांच्यावर टीका करतांना म्हटले की, विजयवर्गीय यांचे वक्तव्य पूर्णपणे दायित्वशून्यतेचे आहे. हे विधान देशात अस्थिरता आणि भीती यांचे वातावरण निर्माण करणारे अन् शांतता आणि बंधुत्व यांवर प्रश्‍न उपस्थित करणारे आहे. यासाठी विजयवर्गीय यांनी जाहीर क्षमा मागितली पाहिजे. विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले पाहिजे की, कोणत्या निवृत्त सैन्याधिकार्‍याने ३० वर्षांनंतर देशात गृहयुद्ध होण्याची भीती व्यक्त केली आहे आणि त्याला आधार काय आहे ?

संपादकीय भूमिका

देशातील हिंदूंची लोकसंख्या अल्प होत असून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे आणि पुढील ३० वर्षांनंतर ती आणखी वाढल्यावर जे काही होईल, तेच विजयवर्गीय यांनी सांगितले आहे. काँग्रेसला हिंदूंशी देणेघेणे नसल्यानेच ती अशी टीका करणारच. हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी भारत काँग्रेसमुक्त करणे आवश्यकता आहे !