|
नाशिक – बांगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने येथे मोर्चा काढण्यात आला होता. हिंदूंचा मोर्चा दूध बाजारपेठेत आला असता तेथे मुसलमानांशी हिंदूंची शाब्दिक चकमक झाली. तेथे मुसलमानांनी घोषणा दिल्या, त्यानंतर हिंदूंनीही घोषणा दिल्या. त्यानंतर मुसलमानांकडून अचानक मोठ्या प्रमाणावर दगडफेक चालू झाली. (हिंदूंचा मोर्चा असल्याने मुसलमानांनी पूर्वीच दगड गोळा करून ठेवून ही पूर्वनियोजित दंगल घडवली, हेच यातून लक्षात येते ! – संपादक) मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत हिंदू आणि पोलीस घायाळ झाले.
Nashik : Sakal Hindu Samaj’s march against ‘Atrocities on Hindus in Bangladesh’ pelted with stones by Mu$l!ms leading to riots.
Hindus and police injured – The riot was pre-planned; Vehicles and glass windows shattered
In Hindu-majority India, there is no freedom to speak… pic.twitter.com/lufrG3L85m
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 16, 2024
नाशिकमध्ये जुने नाशिक, साक्षी गणेश परिसर, मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसर यांसह अन्य भागांत संध्याकाळी काही घंटे पुष्कळ तणावाचे वातावरण होते. प्रत्येक गल्लीत १० ते २० पोलीस होते. एकूण ६०० पोलीस जमले होते. या घटनेनंतर जुन्या नाशिक परिसरात हिंदु संघटनांचे पदाधिकारी जमले. या वेळी मुसलमानांनी गाड्यांवर दगडफेक केली आणि गाड्यांच्या काचाही फोडल्या.
बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येथे हिंदु समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती. हिंदूंनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. भद्रकाली परिसरात सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती देण्यात आली नाही, असेही समजते.
आंदोलनामुळे ज्यांच्या पोटात दुखते, त्यांच्या पाठी सोलून काढा ! – आशिष शेलार, भाजप नेतेकुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये. दगडफेक करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
हिंदूंनी आंदोलन केल्यावर ज्यांची पोटे दुखत असतील, त्यांच्या पाठी सोलून काढा, असे आम्ही पोलिसांना सांगतो. हिंदू येथे मोर्चा काढणार नाहीत, तर कुठे काढणार ? |
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व केवळ हिंदूंचे नाही ! – आमदार नितेश राणे, भाजपजिहादी वातावरण खराब करत आहेत. लँड आणि लव्ह जिहाद, देवतांची विटंबना आदी सर्रास चालू आहे. एका बाजूने त्यांनी हिंदूंवर अन्याय करायाचा, अतिक्रमण करायचे आणि हिंदूंनी स्वतःच्या अधिकारांसाठी रस्त्यावारही उतरायचे नाही ?
महाराष्ट्रात हिंदु विचारांचे सरकार आहे. स्वरक्षणासाठी क्रियेला प्रतिक्रिया द्यावी लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व केवळ हिंदूंचे नाही. जिहाद्यांना कायदे पाळायचे नाहीत. त्यांना शरिया कायदा हवा आहे. हिंदूंना भाईचार्याचे (बंधूभावाचे) डोस पाजले जातात. ते मात्र आमच्या माताभगिनींना संपवत आहेत. जो नियम हिंदूंना लागू आहे, तोच त्यांना करा, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या घटनेविषयी बोलतांना व्यक्त केली. ‘हिंदूंना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल ?’, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी वरील सडेतोड उत्तर ‘एबीपी माझा’ला दिले. (सर्वच हिंदु नेत्यांनी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे ! – संपादक) |
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवर पोलीस हिंदूंना लाठीमार करत असल्याची आणि हिंदू पळत असल्याची दृश्ये काही सेकंदच दाखवण्यात आली. यामुळे हिंदूंनीच दंगल केली, असे कुणालाही वाटू शकते. प्रत्यक्षात दगडफेक मुसलमानांनी चालू केली होती. |
संपादकीय भूमिका
|