विट्ला (कर्नाटक) – दुकानात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अश्रफ (वय ४० वर्षे) नावाच्या दुकान मालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना विट्ला जवळील कुड्डुपदवू येथे घडली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. आरोपी अश्रफ याने यापूर्वी ३ मुलींवर अत्याचार केला होता, याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले आहे.
‘हिंदु जागरण वेदिके’चे जिल्हा संयोजक नरसिंह मणी यांनी ‘आरोपीला त्वरित अटक करावी आणि मागील प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा गुन्ह्यांमध्ये आता दोषींना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! |