Amrit Bharat Station Scheme : दादर, पनवेल, कांदिवली आणि दहिसर येथील रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश !

महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचा समावेश

मुंबई – ‘अमृत भारत स्थानक योजने’च्या सूचीत मध्य रेल्वे मार्गावरील दादर, हार्बर मार्गावरील पनवेल आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली अन् दहिसर या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या ४ रेल्वेस्थानकांचा कायापालट होईल.

१. रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत स्थानक योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत देशभरातील १ सहस्र ३२४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या सूचीत महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.

२. यामध्ये प्रवासी क्षेत्र, शौचालये, लिफ्ट किंवा एस्कलेटर (सरकते जिने), स्वच्छता, वाय-फाय इंटरनेट सुविधा, स्थानिक उत्पादनांसाठी ‘किऑस्क’ (विशिष्ट उद्देशासाठी उभारलेला बूथ), ‘एक स्थानक एक उत्पादन’, माहिती प्रणाली, ‘एक्झिक्युटिव्ह लाऊंज’ (विश्रांतीची जागा) इत्यादीद्वारे स्थानकावरील आवश्यकता लक्षात घेतल्या जाणार आहेत.