‘रणरागिणी महिला विचार मंचा’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात
पुणे – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्याच्या कडेला बांगलादेशींकडून लावण्यात येणार्या कपडे विक्री करण्याच्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांना कायमस्वरूपी येथून हटवावे, या मागणीसाठी ११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ‘रणरागिणी महिला विचार मंचा’च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. (असे आंदोलन का करावे लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
या वेळी पोलिसांनी उज्ज्वला गौड, हेमंत गायकवाड, विशाल नीलकंठ, सुजल गोखले, अंश गुप्ता, दशरथ जाधव आदी कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे.
उज्ज्वला गौड पुढे म्हणाल्या की, ते आमच्या म्हणजे हिंदु मुलींना लक्ष्य करतात. अनेक ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचे धागेदोरे या ठिकाणी सापडले आहेत. केवळ हिंदु मुलींना लक्ष्य करण्यासाठी हे विक्रेते आहेत. तेथील अनेक विक्रेत्यांकडे आधारकार्ड नाही, त्याची पडताळणी केली जात नाही. आंदोलन केल्यानंतर त्यांना तात्पुरते हटवले जाते. त्यांना कायमस्वरूपी येथून हकलून द्यावे, अशी आमची मागणी आहे. येथील विक्रेते हिंदु मुलींचा भ्रमणभाष क्रमांक ‘तुम्हाला नवीन ड्रेस (कपडे) आले की सांगतो, तुमचा क्रमांक द्या’, असे सांगून घेतात. त्यांना भुलवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जाते. या विक्रेत्यांना कायमस्वरूपी हटवले नाही, तर आम्ही त्यांची दुकाने फोडून टाकू. बांगलादेशांमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, तसे करू, अशी चेतावणीही ‘रणरागिणी विचार मंचां’कडून देण्यात आली.
संपादकीय भूमिकाघुसखोर बांगलादेशींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदु महिला संघटनेवर कारवाई करणे हे दुर्दैवी ! |