‘वर्ष २०४७ पर्यंत संपूर्ण भारत ‘विकसित’ करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पहात आहेत; मात्र भारतातील धर्मांध त्याला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे मनसुबे उघड बोलून दाखवत आहेत. अशांना साथ देणारे काँग्रेसी, साम्यवादी किंवा कथित धर्मनिरपेक्षतावाले आता हिंदूंना हिंसाचारी ठरवून धर्मांधांना साहाय्य करत आहेत. थोडक्यात सहिष्णु हिंदू हिंसाचार करू शकत नाहीत, हे सुस्पष्ट असल्याने त्यांना हिंसाचार करण्यास उद्युक्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
१. हिंदूंच्या आंदोलनात घुसून शिवीगाळ करणारी मुसलमान महिला !
१ ऑगस्ट या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीचे काही साधक आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य उरण (जिल्हा रायगड) येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाऊद शेखच्या विरोधात सनदशीर मार्गाने आवाज उठवण्यासाठी आंदोलन करत होते. वर्ष २००२ मध्ये चिपळूण येथेच स्थापन झालेली हिंदु जनजागृती समिती गेली २२ वर्षे अनेक आंदोलने शांतपणे आणि सनदशीर मार्गानेच करत आहे. यासाठी पोलिसांनी समितीचे वारंवार कौतुक केले आहे. याच समितीचे असे आंदोलन चालू असतांना या आंदोलनाला हिंसक स्वरूप देण्याच्या उद्देशाने आणि केवळ हिंदूंना भडकावण्यासाठी गोवळकोट येथील आसमा हनीफ परकार या महिलेने आंदोलनात घुसून अश्लील शिवीगाळ केली अन् हिंदूंना भडकावले. सनदशीर मार्गाने आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ या प्रकाराने संतप्त न झाले तर नवलच ! संतप्त हिंदूंनी या महिलेला अटक करण्याची मागणी करून पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडायला भाग पाडले.
२. महिलांना पुढे करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र
या घटनेतून आता कोकणातही मुसलमान महिला या पुरुषांच्या बरोबरीने जिहादी कारवाया करणार्यांना कशी साथ देत आहेत आणि ‘वर्ष २०४७ ला भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठी कशी सिद्धता करत आहेत’, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदू हिंसक नसतातच; म्हणून तर मुसलमान महिलाही त्यांच्या आंदोलनात येऊन त्यांनाच शिव्या घालू शकतात. यातून धर्मांधांचे आगामी काळातील षड्यंत्र लक्षात येते. समजा याच ठिकाणी मुसलमानांनी आंदोलन केले असते, तर कुणी हिंदु अशा प्रकारे आंदोलनाला विरोध करण्यास धजावला असता का ? आणि जर समजा त्याने तसा प्रयत्न केलाच असता, तर त्याचे काय झाले असते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
३. पोलिसांची हिंदुविरोधी मानसिकता
‘अशा प्रसंगात या आंदोलनाला पोलिसांचा बंदोबस्त नावालाच असतो’, असे कुणी म्हटल्यास वावगे ठरू नये; कारण आंदोलनात गडबड करणार्या महिलेला पोलिसांनी स्वत:हून अटक करण्याचे सोडून तिच्या संरक्षणासाठीच सारी फौज लावली; मात्र संतप्त हिंदूंनी त्या महिलेला अटक करण्यास पोलिसांना भाग पाडलेच. याचा अर्थ हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणला नसता, तर पोलीस निष्क्रीयच राहिले असते, हे स्पष्टच होते. पोलिसांसमोरच हिंदूंना शिव्या घालणार्या महिलेला अटक करण्यासाठी पोलिसांशी झगडावे लागते, यातूनच ‘पोलिसांची मानसिकता ही काँग्रेसची, म्हणजे हिंदुविरोधी राहिली आहे’, हे लक्षात येते. अनेक घंट्यांनंतर महिलेवर गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली.
४. धर्मांध अटक झाल्यानंतर ‘मनोरुग्ण’ असतात हे नेहमीचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) !
२ ऑगस्टला या प्रकरणाचे पुढे काय झाले, हे सांगायलाही पोलीस टाळाटाळ करत होते आणि नंतर मग अटक झालेली महिला ‘मनोरुग्ण’ असल्याच्या हालचाली चालू होतात. पोलिसांच्या या ‘नॅरेटिव्ह’मधून खरे गुन्हेगार मोकाट सुटतात. ही महिला मनोरुग्ण म्हणावी, तर तिला हिंदूंच्याच आंदोलनात गडबड करावी, हे कसे सुचले ? शिव्या दिल्यानंतर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी समाजबांधवाच्याच दुकानात पद्धतशीरपणे कसे जाता आले ? हिंदूंचा दबाव वाढल्यावर तिला क्षमा मागायचे कसे कळते ? या प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासन देणार का ? यातून ‘महिलेला मनोरुग्ण म्हणता येईल का ?’, हा प्रश्न अनुत्तरित रहातो; मात्र ती सध्याच्या व्यवस्थेत ती मनोरुग्ण होऊ शकते. यातूनच तिला अटक झाली, तरी हिंदूंना न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही, हेच स्पष्ट होते.
यातून एक महत्त्वाचे सूत्र हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे ते, म्हणजे ‘सरकार केवळ िहंदुत्वनिष्ठ म्हणणार्यांचे असून चालणार नाही, तर सर्व व्यवस्थाच हिंदुत्वनिष्ठ करण्यासाठी हिंदूंना रामराज्यासम हिंदु राष्ट्रासाठीच प्रयत्न करणे अपरिहार्य ठरते !’
– श्री. संतोष गांधी, गोवा. (५.८.२०२४)
संपादकीय भूमिकाभारतातील धर्मांधांचे ‘इस्लामी राष्ट्र’ करण्याचे मनसुबे उधळून लावण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आणि देशात ‘हिंदु राष्ट्र’ हवे ! |