Farmers Petitions Found In Garbage : शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेली निवेदन पत्रे सापडली कचरापेटीत !

चामराजनगर (कर्नाटक) – विविध मागण्यांची पूर्तता करून समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी काही शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची डॉ. बी.आर्. आंबेडकर स्टेडियम येथे आयोजित एका जाहीर सभेत १० जुलैला भेट घेतली. या वेळी शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांची निवेदन पत्रे सादर केली. ही निवेदनपत्रे ३ दिवसांनी, म्हणजे १३ जुलैला कचरापेटीत सापडली.  मुख्यमंत्र्यांनी येथे काँग्रेसच्या एका सभेला भेट दिली होती.

चामराजनगर येथील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी निवेदने स्वहस्ते स्वीकारली होती.  हा कार्यक्रम झाला होता. त्याच मैदानावर कचरा पेटीत ही निवेदने नुकतीच आढळली. ही उद्दामपणाची सीमा असल्याचा संताप शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका 

  • यातून काँग्रेसची शेतकर्‍यांविषयीची संवेदनशीलता लक्षात येते !
  • शेतकर्‍यांच्या समस्येविषयी ६ दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसने काहीच केले नाही, आताही तिची तीच गत आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !