नवी देहली – देहलीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. हा अंतरिम जामीन अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.
काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना सध्या तरी कारागृहातच रहावे लागणार आहे. केजरीवाल यांना ‘ईडी’कडून झालेल्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपिठाकडे सोपवण्यात आले आहे. तेथे सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन संमत करण्यात आला आहे.