Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन संमत

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन

रांची (झारखंड) – आंचल भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंडज उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथे सैन्याच्या नियंत्रणात असलेल्या ४.५५ एकर भूमीच्या अवैध खरेदी-विक्रीची चौकशी चालू केल्यावर प्रथम महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना आणि नंतर आणखी १३ जणांना अटक केली होती. या आरोपींनी सरकारी अधिकार्‍यांच्या संगनमताने भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचे अन्वेषणात उघड झाले. यानंतर हेमंत सोरेन यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. ३१ जानेवारीपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.