कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्‍वर मंदिरात चोरी !

चांदीचा मुखवट्यासह पाऊण लाखाच्या वस्तू चोरीस !

कोल्हापूर – कोल्हापूरचे ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्‍वर महादेव मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्याने पाऊण किलो चांदीचा मुखवटा, तांब्याचे अभिषेकपात्र, नंदादीप, तसेच पूजेचे अन्य साहित्य, अशा पाऊण लाख रुपयांच्या साहित्याची चोरी केली आहे. मंदिराच्या पुजारी गिरीजा धर्माधिकारी यांनी या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ‘सी.सी.टि.व्ही.’मधील चित्रीकरणाच्या माध्यमातून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. कपिलेश्‍वर मंदिर हे शिवाचे प्राचीन मंदिर असून ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या बाहेरच्या भागात माहेश्‍वरीदेवी आणि श्री हनुमान यांची मूर्ती आहे.