छत्रपती संभाजीनगर येथे ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या दुय्यम निरीक्षकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली !

(इन्सेटमध्ये) छगन पाटील 

छत्रपती संभाजीनगर – दस्त नोंदणीसाठी स्टॅप वेंडरच्या माध्यमातून ५ सहस्र रुपयांची लाच घेणारा सिल्लोड येथील दुय्यम निबंधक छगन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने (एसीबी) २ मार्च या दिवशी रंगेहात पकडले होते. ‘एसीबी’ने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून तब्बल १ कोटी ३६ लाख ७७ सहस्र रुपयांची रोकड आणि २८ तोळे सोन्याचे दागिने सापडले होते. पाटील याने भ्रष्ट आणि गैरमार्गाने १ कोटी ८० लाख ८० सहस्र १५५ रुपयांची मालमत्ता जमवली होती. मालमत्ता संपादीत करण्यासाठी त्याच्या पत्नीनेही त्याला साहाय्य केल्याचे अन्वेषणात समोर आल्याने १४ जून या दिवशी दोघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  (भ्रष्टाचार्‍यासह त्याच्या पत्नीवरही कारवाई करणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! – संपादक)