Boliyar Mosque Altercation : कर्नाटकमध्ये कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

दक्षिण कन्नड – येथील बोलियार भागात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयाचा उत्सव साजरा केल्यावरून धर्मांध मुसलमानांनी भाजपच्या ३ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण केले होते. आता येथे कथित चिखावणीखोर घोषणा दिल्यावरून भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

१. बोलियार जुम्मा मशिदीचे अध्यक्ष पी.के. अब्दुल्ला यांनी काही युवकांनी मशिदीसमोर भावना दुखावणार्‍या घोषणा दिल्याची तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी भाजपचे कार्यकर्ते सुरेश, विनय, सुभाष रणजीत आणि धनंजय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

२. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शाकीर, अब्दुल रजाक, अबूबकर सिद्दिक, सवाद आणि हफीज या आरोपींना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दडपशाही ! अशा काँग्रेसला हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवतात !