Jayesh Pujari Beaten In Court : ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा गुंड जयेश पुजारी याला न्यायालयाच्या परिसरात चोपले ! 

बेळगाव –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी गुंड जयेश पुजारी याच्यावर गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला पोलिसांनी न्यायालयात आणले असता गाडीतून उतरल्यावर जयेश पुजारीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे तेथे उपस्थित असणारे नागरिक आणि अधिवक्ता यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जयेशला न्यायालयाच्या आवारातच चोपले.

गुंड जयेश पुजारी

(अशा घोषणा देण्याचे धारिष्ट्य कुणाचे होणार नाही एवढी जरब सरकारी यंत्रणांनी निर्माण करणे आवश्यक !  – संपादक) या प्रकाराने न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असणार्‍या अनेकांनी ‘अशा पाकप्रेमींना चांगला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.