Jammu Kashmir Terror Attack : कठुआमध्ये २ सैनिकांना वीरगती, तर  डोडा येथे एक आतंकवादी ठार !  

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत ३ आतंकवादी आक्रमणे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३ दिवसांत ३ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. ९ जूनच्या सायंकाळी जम्मूतील रियासी येथील आक्रमणात ९ हिंदू  ठार झाले होते. त्यानंतर आता डोडा जिल्ह्यातील सैन्याच्या एका तात्पुरत्या तळावर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. या वेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात १ आतंकवादी ठार झाला, तर आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ व्यक्ती घायाळ झाला. तिसर्‍या घटनेत कठुआ येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले; मात्र या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले.

येथे ११ जूनच्या रात्रीपासून चकमक चालू होती. येथे ठार झालेल्या आतंकवाद्यांकडून ३० गोळ्या राहु शकणारी ३ मॅगझिन, २४ गोळ्या असलेली १ मॅगझिन, ७५ जिवंत काडतुसे, ३ ग्रेनेड, १ लाख रुपये, खाद्यपदार्थ, औषधे, पाकिस्तानात बनवलेले इंजेक्शन आदी जप्त करण्यात आले.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीर अद्यापही आतंकवादग्रस्तच आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !