Kashmir Terror Attack : काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण – ९  हिंदु भाविक ठार

शिवखोरी गुहेच्या दर्शनासाठी भाविकांना नेणार्‍या बसवर गोळीबार

आतंकवाद्यांनी गोळीबार केल्याने खड्ड्यात कोसळलेली बस

जम्मू : शिवखोरी ते कात्रा या मार्गावरून जाणार्‍या हिंदु भाविकांच्या बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर गोळीबार केल्याने त्याने बसवरील नियंत्रण गमावले आणि बस खड्ड्यात कोसळली. यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण घायाळ झाले. येथे रात्री उशिरा साहाय्यता कार्य चालू होते. ही बस भाविकांना शिवखोरी या पवित्र गुहेच्या दर्शनासाठी घेऊन जात हाती. या आक्रमणानंतर तात्काळ शिवखोरी गुहेचा परीसर सुरक्षादलांनी नियंत्रणात घेतला.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !