सूर्यनमस्कार एक परिपूर्ण योगसाधना !

भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्यप्राप्तीकरता सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर, निकोप मन आणि सर्वंकष आरोग्याची प्राप्ती होते. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सूर्यनमस्काराचा अभ्यास करू शकतात. सूर्यनमस्कार हा बीजमंत्रांसह सूर्यदेवतेच्या विविध नामाचे उच्चारण करत केल्यास उपासना आणि व्यायाम असा दुहेरी लाभ आपल्याला होतो. सूर्यनमस्कारामध्ये आसन, प्राणायाम, षटचक्र जागरण, तसेच मंत्रोच्चार असल्याने ही एक प्रकारची परिपूर्ण योगसाधनाच आहे

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१४.२.२०२४)

सूर्यनमस्कार घातल्याने होणारे लाभ

१. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.

२. हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.

३. बाहू आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात.

४. पाठीचा मणका आणि कंबर लवचिक होतात.

५. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.

६. पचनक्रिया सुधारते.

७. मनाची एकाग्रता वाढते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दिनचर्या’)

सूर्यनमस्कार घालतांना म्हणायचे सूर्याच्या नावाचे १२ मंत्र

१. ॐ मित्राय नमः।

२. ॐ रवये नमः।

३. ॐ सूर्याय नमः।

४. ॐ भानवे नमः।

५. ॐ खगाय नमः।

६. ॐ पूष्णे नमः।

७. ॐ हिरण्यगर्भाय नमः।

८. ॐ मरीचये नमः।

९. ॐ आदित्याय नमः।

१०. ॐ सवित्रे नमः।

११. ॐ अर्काय नमः।

१२. ॐ भास्कराय नमः।